Pulpit rock
सूचना:तुमचा बँक पासवर्ड गुप्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच सतत पासवर्ड बदलत राहा.

मोबाइल बँकिंगनंतर आता टॅब्लेट बँकिंग



इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंगच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतानाच आता बँकिंग जगताने नव्याने होऊ घातलेली टॅब्लेट क्रांती कॅश करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी ‘टॅब बँकिंग’ ही नवी सेवा सुरू करून खासगी क्षेत्रात अग्रणी असलेल्या बँकांनी पहिले पाऊल टाकले आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना आता खाते उघडण्यासाठी बँकांच्या शाखेत हेलपाटे न मारता घरच्या घरी किंवा कार्यालयातच ते उघडता येऊ शकेल. केवळ इतकेच नाही, तर आणखी चार नवीन सेवा बँकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
ग्राहकांना अखंडित व आनंदपूर्ण अनुभव देण्यासाठी 5 एमपी कॅमेरा व जलद प्रोसेसर असलेला हाय-एंड कस्टमाइज्ड टॅब्लेट ही या उत्पादनाची वैशिष्ट्ये आहेत.बँक अधिकारी या टॅब्लेटमार्फत  अर्ज भरण्यासाठी ग्राहकांना मदत करतात. यामध्ये बिल्ट-इन तपासणीची सोय आहे, ज्यामुळे अर्जातील सर्व तपशील बरोबर असल्याची आणि आवश्यक ती सर्व माहिती   बरोबर घेतल्याची खात्री मिळते.
ग्राहकाचा फोटो घेण्यासाठी आणि त्याची केवायसी कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी उपयोग. त्यामुळे प्रत्यक्ष दस्तऐवज सादर करण्याची गरज नाही. माहिती पूर्ण भरून झाली की, ती तातडीने बॅक-एंड यंत्रणेत अपलोड केली जाते आणि यामुळे बँक खाते उघडण्याची प्रक्रिया झटपट होण्यास मदत होते. बँकेच्या अधिका-यांना आमच्या इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग माध्यमांविषयी व अन्य उत्पादनांविषयी ऑडिओ व्हिज्युअल प्रात्यक्षिक दाखवता येईल.
ग्राहकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी टॅब्लेटमध्ये विविध साधने व कॅल्क्युलेटर इन-बिल्ट आहेत. उदा. ज्या प्रकारे मासिक सरासरी बाकी मोजली जाते किंवा मुदत ठेवीचे व्याजदर कालावधीशी जोडले जातात वा ग्राहकांना ब्रँच लोकेटरविषयी सांगितले जाते.
24 बाय 7 इलेक्ट्रॉनिक शाखा
 बँकेने 24 * 7 इलेक्ट्रॉनिक शाखा दाखल केल्या आहेत, ज्या सर्व बँकिंग व्यवहारांसाठी वन-स्टॉप शॉप आहेत. ग्राहकांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार, विविध ऑटोमेटेड उपकरणांच्या व किऑस्कच्या मदतीने स्वत:चे स्वत: व्यवहार करता येतील.
इलेक्ट्रॉनिक शाखा चेक डिपॉझिट मशीन, डेबिट कार्ड स्वाइप करून इंटरनेट बँकिंग सेवा वापरता येईल असे संवादात्मक किऑस्क, तातडीने पैसे जमा करणारे कॅश डिपॉझिट मशीन आणि आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअर कर्मचाºयासोबत चोवीस तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा सुविधा देतात. सध्या 18 ठिकाणी 25 इलेक्ट्रॉनिक शाखा आहेत.
ग्राहकांचा फायदा असा :
ग्राहकांना घरात बसून खाते उघडता येईल. फोटो काढण्यासाठी वा केवायसी कागदांच्या प्रती काढण्यासाठीही घराबाहेर जावे लागणार नाही. खाते उघडण्याची प्रक्रिया विनासायास असेल. ग्राहकांना प्रात्यक्षिक पाहता येईल. इंटरनेट व मोबाइल बँकिंग माध्यमांविषयी माहिती करून घेता येईल तसेच सर्व उत्पादने पाहून त्यातून योग्य त्या उत्पादनाची निवड करता येऊ शकेल. ज्या सर्व गोष्टी वेळ व ठिकाणाच्या सोयीनुसार करता येतील


माझ्याबद्दल

मी दत्तात्रय आवारे सामान्य नागरिकांसाठी ई-बॅंकिंग सेवा सुरू होऊन 10 ते 12 वर्षे होऊन गेली असून, त्यात मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढच होत गेली आहे.

अधिकवाचा

महत्वाच्या लिंक

जाहिरातीसाठी संपर्क:७५८८०९७०६२
या पानाच्या वरील भागावर जा कॉपीराईट © २०११ | सर्व प्रकारचे अधिकार सुरक्षित आहे.ब्लॉग डिजाईन ऑलवेब डिझाईन